Prakash Ambedkar: शरद पवार-आंबेडकरांची ‘चाय पे चर्चा’, नव्या चर्चेला उधाण

मुंबई तक

21 Oct 2023 (अपडेटेड: 21 Oct 2023, 01:57 PM)

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना आता उधान आले आहे. इंडिया आणि महाविकास आघाडी विषयी काही चर्चा झाल्या का असं विचारल्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दिलखुलास असं उत्तर दिलं आहे.

meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment

meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment

follow google news

Pawar-Ambedkar meeting: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी ढवळून निघत आहे. त्यातच आज शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. मुंबईतील आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao chavan center) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या पुस्तकाला शंभर वर्षे झाल्याबद्दल कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकत्र आले होते. त्या भेटीवर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नावर बोलताना त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला.(meeting of prakash amdekar and sharad pawar political talks did not discuss India alliance no comment)

हे वाचलं का?

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलतान सांगितले की, आज शरद पवार यांच्याबरोबर भेट झाली असली तरी त्याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर आज वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्यासोबतच इतर 12 जणही उपस्थित होते. त्यांच्याबरोबरही वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा >> Gaganyaan : इस्रोने रचला इतिहास, गगनयानच्या क्रू मॉड्यूलची यशस्वी चाचणी!

‘इंडिया’विषयी निर्णय घेणार

आजच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीविषयी काही चर्चा झाली का असं विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात त्यावर चर्चा झाली नसली तरी काही दिवसांपूर्वी त्याविषयी आमची चर्चा झाली होती. त्यामुळे आता पाच राज्यांच्या निवडणुकांविषयी आणि देशातील निवडणुकांवर थोड्याच दिवसात चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जरांगे-पाटील सरकारच्या अंगलट

यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी कॉफी दिली. त्यावेळी कॉफी गोड होती का यावर ते म्हणाले की, कॉफीमध्ये साखर टाकून गोड करण्यात आली होती असंही त्यांनी दिलखुलासपण उत्तर दिले. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावरुन सरकारचे कान टोचले आहेत. सरकारकडून ज्या प्रकारे त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिला जात आहे. त्यांच्याविषयी ज्या प्रकारे चालढकल केली जात आहे. हे सरकारचं वागणं त्यांच्या अंगलट येऊ शकतं असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

पिढ्यान् पिढ्या बरबाद

राज्यात सध्या अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नोकरी आणि शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिघळले आहे. शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे पिढ्यान् पिढ्या बरबाद होत आहेत. त्यामुळेच हा वर्ग त्यांच्यामागे उभा राहिला आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारने त्यांच्या आंदोलनात चालढकल न करत त्यांच्या प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढून निर्णय घेतला पाहिजे. नाही तर त्यांच्यावरच हा डाव उधळू शकतो अशा शब्दात त्यांनी सरकारवर तोफ डागली आहे.

भाजपला कायमच विरोध

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये येऊ देणार नाही असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र त्यावरही त्यांनी बोलताना सांगितले की, जोपर्यंत कोणत्याही पक्षाबरोबर भाजप सोबत असणार आहे. मग त्यामध्ये राष्ट्रवादीतील एका गटाने भाजपबरोबर जात सत्तेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्याबरोबर भाजप सोबत आहे. त्यामुळे त्यांना माझा कायमच विरोध असणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Crime: 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला, जागीच गेला जीव

तशी चर्चा नाही

महाविकास आघाडीबाबतही यावेळी काही महत्वाची चर्चा करण्यात आली नाही. कारण आजच्या कार्यक्रमाचा वेगळा विषय होता असं सांगून त्यांनी मविआबरोबर जाण्याच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. आजच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्याबरोबर गेलो असलो तरी राजकीय चर्चा झाल्या नाहीत. मात्र पवार-आंबेडकरांची भेट झाल्यावर मात्र राज्यात त्यांच्या भेटीगाठीवर चर्चा करण्यात येत आहे.

 

अशोक चव्हाणांनी केले स्वागत

प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची आज मुंबईत एका कार्यक्रमानिमित्त भेट झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. त्यांची झालेली ही भेट अतिशय स्वागतार्ह बाब असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीने आणखी सकारात्मक पावले उचलण्याचे हे चांगले संकेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भविष्यातही होऊ शकते चर्चा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना स्वागत तर केले आहेच. मात्र त्याचवेळी त्यांनी आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र यावी ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. आजही आंबेडकरांच्या भाषेत एखाद्या कार्यक्रमात जे काही घडते ते सकारात्मक आहे. त्यामुळे यावर भविष्यातही चर्चा होऊ शकते असंही त्यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडीसाठी भविष्यात काही चांगली सकारात्मक पावले उचलली जावी अशी इच्छाही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp