Raj Thackeray And Sonali Benedre Viral Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे 30 वर्षांनंतर एकाच मंचावर आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दोघांच्या केमिस्ट्री आणि मैत्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. एवढच नाही, तर दोघांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. 1990 च्या दशकात दोघांच्या मैत्रीची तुफान चर्चा रंगली होती. त्यानंतर राज ठाकरेंचं लग्न शर्मिला ठाकरे यांच्याशी झालं. परंतु, मराठी भाषा दिन म्हणजेच 28 फेब्रुवारीला मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सोनाली बेंद्रे यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या भेटीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
ADVERTISEMENT
30 वर्षानंतर दिसले एकत्र
1996 मध्ये मायकल जॅक्शन मुंबईत आल्यानंतर हे दोघेही एकत्रित स्पॉट झाले होते. त्यानंतर आता मनसेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सोनाली बेंद्र आणि राज ठाकरे यांची भेट झाली. दोघांची भेट झालेला हा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दर्शवली आहे. दोघांची मैत्री अजूनही घट्ट आहे, ही चांगली गोष्ट आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही इव्हेंटला हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा >> Washim मध्ये 24 तासात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आईसस्क्रीम देण्याच्या बहाण्याने दुकानात घेऊन जात...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या इव्हेंटचं आयोजन केलं होतं. अभिनेत्री सोनाली बेंद्र या इव्हेंटला गेस्ट म्हणून हजर राहीली होती. परंतु, सोनाली बेंद्रेंचं स्वागत करण्यासाठी स्वत: राज ठाकरे या कार्यक्रमाला पोहोचले. सोनाली बेंद्र यांनीही राज ठाकरेंना अभिवादन स्वीकारलं. दोघांमध्ये खूप चांगला बॉण्ड दिसत असल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
हे ही वाचा >> Thane Crime : 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला, नंतर प्रकार लपवण्यासाठी आरोपीने नातेवाईकांसोबत...
सोनाली बेंद्रे आणि शर्मिला ठाकरे यांच्यातही अनेक गप्पा रंगल्या. राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात कविताही सादर केली. सोनाली बेंद्रे यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. मनसेच्या या कार्यक्रमात विक्की कौशल, रितेश देशमुख, अशोक शराफ असे दिग्गज कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.
ADVERTISEMENT
