Narayan Rane vs Aaditya Thackeray : मालवणच्या राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. भाजप खासदार नारायण राणे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांनी राणेंविरोधात जोरदार घोषणा केली होती. त्यामुळे राणे-ठाकरे यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी मोठं आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. धाडसी पुरुष..वय वर्ष 34, असा उल्लेख करत राणेंनी आदित्यला डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, "मी पुतळा पाहण्यासाठी त्या दिवशी गेलो. पुतळा वरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काहीच नव्हतं. ७-८ मिनिटांनी मी तिथून घरी जायला दुसऱ्या रस्त्याने निघालो. महादेवाच्या मंदिरात नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आवाज आला. काही लोक घोषणा देत होते.
हे ही वाचा >> Ladaki Bahin Yojana: अपात्र महिलांना पुन्हा संधी! लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार? फक्त...
मी पोलिसांना विचारलं कोण आहे, ते म्हणाले आदित्य ठाकरे आहेत. मी पोलिसांना म्हणालो, मी अधिकृतपणे पत्र दिलं होतं. पण ते समोरून आले, त्यांनी रितसर जायला पाहिजे होतं. दुख:द घटना आहे. वैभव, राऊत सर्वच घोषणा देत होते. मी ते रुप पाहून म्हणालो एसपी साहेब हे पुन्हा परत जाणार नाहीत. आपला हुकूम आहे. आपण नाही बोललो तर नाही जाणार. दोन तास जागेवर बसले."
राजकोटमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाहणीदौऱ्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या समर्थकांनीही राणेंच्या कार्यकर्त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं होतं. दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानं हाणामारी झाली होती. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्याच्या परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं.
हे ही वाचा >> Vanraj Andekar Murder Case : आंदेकर टोळीचा म्होरक्या कोण? वाचा INSIDE स्टोरी
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
"काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते. त्यांची बुद्धी उंचीएव्हढीच आहे. त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. भाजपवाल्यांना विचारा, त्यांच्याकडून काय आदर्श ठेवायचा? माझ्या महाराष्ट्राला लुटत चालले आहेत. वेदांत फॉक्सकॉनसारखे प्रकल्प गुजराला नेत आहेत आणि इथे येऊन लढाई करतात."
ADVERTISEMENT
