Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिकच तापले आहे. त्यातच आता मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून सरकार पळ काढतय असल्याचा ठपका ठेवत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्यच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadase) यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Resrvation) देणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लिहून दिले होते, मात्र आता सरकारची मराठ्यांना आरक्षण देण्याची मानसिकताच नसल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी सरकारवर केला आहे.
ADVERTISEMENT
महाजनांनी लेखी दिलं होतं
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधताना त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. ज्या गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना लिहून दिले होते. ते गिरीश महाजन आता आरक्षण देण्यापासून पळ काढत आहे. त्यातच ओबीसीमधून आरक्षण देण्याची भाषा त्यांनी केली होती. त्यामुळे आज जी जरांगे पाटील यांनी मागणी केली होती, ती योग्यच होती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> Lok Sabha 2024 : ठाकरेंना झुकतं माप! ‘मविआ’चं जागावाटप अंतिम टप्प्यात
जरांगेंची भूमिका योग्यच
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यानंतर सरकारच्या एका समितीने जरांगे पाटलांना भेटून चर्चा केली होती. त्यावेळीही त्यांनी लेखी लिहून दिले होते की, ओबीसीमधून आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, त्यामुळे आज जी जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली आहे ती योग्यच असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवरायांची शपथ
एकनाथ खडसे यांनी सांगितले की, मी वारंवार सांगितलं आहे की, मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका अस्पष्ट आहे. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे व ओबीसींमधून सगळ्या सगासोयऱ्यांमधून द्यायचे आहे असंही गिरीश महाजन आणि त्यांच्या मंत्र्यांनी लेखी लिहून दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सांगितले की, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार, मात्र आता तसं चित्र न दिसता सरकार पळ काढत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.
आरक्षणाचा प्रश्न सोडवा
सरकारमधील गिरीश महाजन आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी जो जरांगे पाटलांना शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी आरक्षण देऊन हा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी ही एकनाथ खडसे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही याआधी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असंही या आधीच सांगितलं होते.
ADVERTISEMENT