Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावरुन झालेल्या वादानंतर नागपूरमध्ये हिंसाचारही झाला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने (व्हीएचपी) औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. शिवजयंतीपर्यंत कबर काढली नाही, तर हा विषय आम्ही हातात घेऊन, असा इशारा या संघटनांनी दिला होता. या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. मात्र या सगळ्यात हिंदू धार्मिक स्थळे आर्थिक संकटात सापडली आहेत.
ADVERTISEMENT
हिंदू मंदिरांतील भाविकांची संख्या घटली
राज्यात सध्या सुरू असलेल्या तणावाचा परिणाम मंदिरांवरही दिसून येतोय. संभाजीनगरमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, भद्रा मारुती, गिरिजा देवी मंदिर, सुलीभंजन दत्त मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. नेहमी पर्यटकांची गर्दी असलेल्या देवगिरी किल्ल्यावर लोकांची संख्याही कमी झाली आहे. औरंगजेबाची कबर आणि ही सर्व धार्मिक स्थळं एकमेकांच्या अगदी जवळ आहेत.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "आपल्या बोलण्यातून तेढ...", देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना राजधर्माची आठवण करुन दिली
घृष्णेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सामान्य दिवसांमध्ये इथे दररोज 20,000 भाविक येतात. आठवड्याच्या शेवटी आणि सोमवारी ही संख्या 40,000 च्या वर जाते. मात्र, सध्याच्या तणाव आणि अशांततेमुळे भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली. मंदिर विश्वस्त योगेश टोपरे यांनी ही माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत फक्त 18,000 ते 20,000 भाविकांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि नागपूर दंगलीनंतर ही संख्या केवळ 5,000 वर आली आहे.
भद्रा मारुती मंदिरात 40% घट
प्राचीन भद्रा मारुती मंदिर हे निद्रावस्थेत असलेल्या अनोख्या हनुमानाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. तिथेही दररोज सुमारे 15 हजार भाविक येतात, मात्र या वादामुळे भाविकांची संख्या तब्बल 40 टक्क्यांनी घटली आहे.
हे ही वाचा >> Disha Salian: 'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नाव, खळबळन उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी
मंदिरांभोवती असलेल्या स्थानिक व्यवसायांचंही मोठं नुकसान झालं आहे. पूजा साहित्य, फुले, प्रसाद आणि धार्मिक स्मरणिका विकणाऱ्या विक्रेत्यांनी 70% पर्यंत विक्रीत घट नोंदवली आहे.
पर्यटनावर परिणाम
या वादाचा परिसरातील पर्यटनावरही परिणाम झाला आहे. वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक भाविक आणि पर्यटकांनी त्यांचा प्रवास रद्द केला आहे.
ADVERTISEMENT
