Sanjay Raut : ''...तर तुमचा कडेलोट केला असता'', संजय राऊतांनी महायुतीवर डागली तोफ

मुंबई तक

01 Sep 2024 (अपडेटेड: 01 Sep 2024, 10:41 AM)

Sanjay Raut Press Conference : राककोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी महायुती सरकारविरोधात जोडे मारा आंदोलन करत आहे. मविआने आंदोलनाची हाक दिल्यानंतर महायुतीनंही विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत पत्रकार परिषद

संजय राऊत पत्रकार परिषद

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांचा महायुती सरकारवर घणाघात

point

राऊतांनी सांगितलं शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागचं कारण

point

संजय राऊतांनी महायुतीला दिला मोठा इशारा

Sanjay Raut Press Conference : राककोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी महायुती सरकारविरोधात जोडे मारा आंदोलन करत आहे. मविआने आंदोलनाची हाक दिल्यानंतर महायुतीनंही विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलीय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

"प्रधानमंत्र्यांनी (नरेंद्र मोदी) माफी मागितली असेल, हा त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री, अजित पवार किंवा त्यांचे इतर काही सहकारी असतील, पण माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राला त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला अशाप्रकारे थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीत अशाप्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते. तुम्ही जर ती देणार नसाल, तर ही तुमची दडपशाही आहे. आज रविवार आहे. ज्या भागात आज आंदोलन होत आहे, तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे. तरीही आंदोलनाला परवानगी देत नसाल, तर तुमच्या मनातील हुकूमशाहीची विकृती वाढली आहे. आम्ही फक्त जोडे मारा आंदोलन करतोय. शिवाजी महाराजांचा काळ असता, तर तुमचा कडेलोट केला असता", असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर तोफ डागली.

हे ही वाचा >>  Maharashtra Live Updates, Mahayuti Protest : भाजपचा मविआविरोधात एल्गार! शिवरायांच्या पुतळ्यासमोर आज करणार राज्यव्यापी आंदोलन

राऊत पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, आम्ही आंदोलन करतोय, म्हणून हे भाजपचे लोक आंदोलन करत आहेत. हा हास्यास्पद मूर्खपणा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करत आहोत आणि हे आमच्याविरोधात आंदोलन करतात. यांची डोकी फिरलेली आहेत, हे मी वारंवार म्हणत आहे. शिवाजी महाराजांचं सन्मान राखण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. पण भारतीय पक्षाचे मूर्ख लोक आमच्याविरोधात आंदोलन करत आहेत. हे यांचं शीवप्रेम आहे. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असती, तरी ११ वाजता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे हजारो कार्यकर्ते हे पोहचतील आणि आमचं आंदोलन सुरु होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सातत्याने ठिकठिकाणी सुरु राहिल.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : महिलांनो, खाते तपासायला सुरू करा...आजच 3000 जमा होणार?

या राज्यात ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते, त्यांनी अपमान केला. मग त्यांनी माफी मागितली. काही मंत्र्यांनी केला, त्यांनीही माफी मागितली. सध्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणतात, पुतळा तुटला याचे दु:ख कशाला करायचं, वाईटातून चांगलं घडलं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि वाईटातून चांगलं घडतं. ही यांची विकृती आणि मनोवृत्ती आहे. राजकोट किल्ल्यावर जो पुतळा कोसळला, हा सरळा भ्रष्टाचार आहे. आपापल्या लोकांना कामं देण्यास जी स्पर्धा सुरु आहे, त्यातून हा पुतळा कोसळला, असंही राऊत म्हणाले. 

    follow whatsapp