Virat Kohli Challenge : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडिया फार चांगली कामगिरी करते आहे. आतापर्यंत सलग दोन सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा उत्साह दुणावला आहे. आज टीम इंडियाचा तिसरा सामना अमेरिकेविरूद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वीच टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) अमेरिकन खेळाडूने इशारा दिला आहे. नेमका तो काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. (ind vs usa t20 world cup 2024 american faster bowler warned virat kohli before match)
ADVERTISEMENT
स्टार स्पोर्टसने अमेरिकन क्रिकेटर सौरभ नेत्रावलकर, कर्णधार मोनंक पटेल, हरमीत सिंह, अली आणि कोरी एंडरसन यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खेळाडू भारतासोबत सामना खेळतानाचा अनुभव सांगत आहेत.
हे ही वाचा : "तीन महिन्यांनी मी राज्य तुमच्या हातात देतो", पवारांकडून सूचक संकेत
जर आम्ही आमचं चांगलं प्रदर्शन केलं तर आम्ही टॉप किक्रेटरसोबत टक्कर घेऊ शकतो. आम्ही एकाच वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करून आणि स्टार खेळाडूंना पाहुन आम्ही आमचं लक्ष विचलित होऊ देणार नाही. आम्ही स्टार खेळाडूंविरूद्द चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करू असा विश्वास अमेरिकन क्रिकेटर सौरभ नेत्रवलकर यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेला आणि अमेरिकेचा मिडियम पेसर गोलंदाज अली खान म्हणाला, विराट कोहली माझ्या आवडत्या खेळाडूंमधला एक खेळाडू आहे. त्यांच्याविरुद्ध सामना खेळणे खूप आनंददायी अनुभव आहे. तो मैदानात खूर स्फुर्तीन खेळतो, मी देखील त्याच्यासारखाच आहे. मैदानात जर वातावरण गरम असेल, तर मी देखील तसाच खेळतो. माझं म्हणण आहे तुम्हाला आग आणि आगीशी खेळायला हवं.
हे ही वाचा : आता BJP काय करणार? राज ठाकरेंना हव्या विधानसभेच्या 'एवढ्या' जागा!
दरम्यान आता रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.या सामन्यात कोण बाजी मारत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT