Viral Video: "मुंब्रा बंद करून टाकेन..."; मराठी भाषेवरून मुंब्य्रात राडा; मराठी तरुणालाच मागायला लावली माफी

Mumbra Marathi Language Dispute Viral Video: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतानाच ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे खळबळजनक घटना घडली. विशाल गवळी नावाच्या तरुणाने मुंब्रा येथील फेरीवाल्यांना मराठी भाषा बोलायला सांगितलं.

ADVERTISEMENT

Mumbra Marathi Boy Conflict Viral Video
Mumbra Marathi Boy Conflict Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंब्र्यात मराठी भाषा बोलणाऱ्या तरुणालाच माफी मागायला लावली

point

मराठी भाषा बोल म्हणणाऱ्या तरुणावर पोलिसांनी केली कारवाई

point

मुंब्र्याच्या आयडियल मार्केटमध्ये घडलं तरी काय?

Mumbra Marathi Language Dispute Viral Video: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतानाच ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे खळबळजनक घटना घडली. विशाल गवळी नावाच्या तरुणाने मुंब्रा येथील फेरीवाल्यांना मराठी भाषा बोलायला सांगितलं. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी भाषा आली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राच्या बाहेर जा, असं म्हणणाऱ्या विशाल गवळीलाच मुंब्र्यातील स्थानिक लोकांनी माफी मागायला लावली. हा धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. परंतु, विशालचं मानसिक संतुलन ठीक नसल्याचं त्याची आई कलमा गवळी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील आयडियल मार्केटमध्ये विशाल गवळी (21) नावाच्या तरुणाने स्थानिकांना मराठी भाषा बोलण्याची गळ घातली. विशाल मार्केटमध्ये फळ घेत असताना, विक्रेत्याला त्या फळाची किंमत काय आहे, असं विचारतो. त्यानंतर फळ विक्रेता म्हणाला की, मला मराठी येत नाही. तुम्ही माझ्याशी हिंदीमध्ये बोला. त्यानंतर वादविवाद एव्हढा वाढला की, स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी तुफान गर्दी केली. त्यानंतरही विशालने त्या लोकांना मराठी बोलण्यासा सांगितलं.

हे ही वाचा >> Walmik Karad गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी मुंबई Tak च्या हाती

तुम्हाला जर मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं विशालने म्हटलं. त्यानंतर स्थानिकांनी मुंब्रा पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि पोलिसांनी विशाल विरोधात तक्रार नोंदवलीय.या प्रकरणी विशालची आई कमला गवळी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाहीय.

माझ्या मुलाने मला रुग्णालयात दाखल केलं होतं आणि औषधे घेण्यासाठी मार्केटमध्ये गेला होता. माझी पोलिसांना विनंती आहे की, माझ्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढा. त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका. "मुंब्रा नेहमीच गंगा-जमुना सभ्यतेसाठी ओळखलं जातं. आम्हाला कोणत्याही प्रकारचा जातीय मतभेद निर्माण करायचा नाही. त्यामुळे आम्ही विशाल गवळीला काहीही केलं नाही. त्याला आम्ही थेट मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आणला", अशी प्रतिक्रिया मुंब्य्रातील स्थानिक नेते अब्दुल रहमान अन्सारी यांनी दिलीय.

हे ही वाचा >> Walmik Karad: वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती, कारण 'ती' मशीन...

इथे पाहा व्हिडीओ

हे वाचलं का?

    follow whatsapp