Vidhansabha Election 2024: आमदार व्हायचं स्वप्न भंगलं! एक मिनिटामुळं 'या' नेत्याला अर्ज भरता आला नाही

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Anis Ahmed Nomination Canceled
Nagpur Central Vidhansabha Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर मध्य विधानसभेसाठी 'या' नेत्याला अर्ज दाखल करता आला नाही

point

फक्त एक मिनिट उशिर झाल्याने अर्जाची प्रक्रिया थांबली

point

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?

Anis Ahmed Latest News: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. परंतु, अर्ज भरताना किती धावपळ होते आणि वेळेचं किती महत्त्व असतं, याचा प्रत्यक्ष अनुभव नागपूरचे नेते अनीस अहमद यांना आला आहे. कारण अहमद यांना एक मिनिट उशिर झाल्यानं त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. 

मध्य नागपूर विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघडीने अनीस अहमद यांना उमेदवारी घोषित केली होती. परंतु, अहमद यांना एक मिनिट उशिर झाल्याने त्यांना उमेदवारीचा नामांकन अर्ज भरता आला नाही. माजी आमदार आणि मंत्री अहमद यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल, अशी चर्चा होती. पण काँग्रेसने अहमद यांना तिकीट नाकारल्याने अहमद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

हे ही वाचा >>  Raj Thackeray : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, राणेंचं नाव घेत 'तो' किस्सा सांगितला

वंचित बहुजन आघाडीने अनिस अहमद यांना तिकीट दिलं. 29 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. त्या दिवशी अहमद अर्ज करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. अहमद यांनी अर्ज भरण्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. पण त्यावेळी तीन वाजून एक मिनिटांची वेळ झाली होती. अर्ज करण्याची वेळ तीन वाजेपर्यंतच देण्यात आली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र, अहमद यांना एक मिनिट उशीर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हॉलचा दरवाजा बंद केला. त्यामुळे अनिस अहमद यांना नामांकन अर्ज दाखल करता आला नाही. या सर्व प्रकारानंतर अहमद यांनी प्रशासनावर टीका केली आहे. ते आरोप करत म्हणाले की, मी तीन वाजेच्या आतच कार्यालयात पोहोचलो होतो. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: 'काहीही फुकट...', लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचं सडेतोड विधान!

अनिस अहमद यांनी दावा केला की, माझा माणूस आतमध्ये बसला होता. त्याच्याकडे आठ नंबरचं टोकन दिलं होतं. जर तो व्यक्ती आतमध्ये बसला होता, तर मला आतमध्ये जाऊ का दिलं नाही? जर या दरवाज्यातून प्रवेश केला, तर दुसरा कोणताच दरवाजा तिथे असण्याची आवश्यकता नाही. तीन वाजेच्या आत मेन गेट, सेमी गेट, सर्व दरवाज्यांमधून आत प्रवेश केला होता. अधिकाऱ्यांनी मला आत जाऊ दिलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT