Jitendra Awhad : "मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून...", माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल करत आव्हाड काय म्हणाले?

मुंबई तक

Jitendra Awahd Press Conference : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलीय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

point

"फसवणुकीच्या गुन्ह्यात प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा..."

point

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

Jitendra Awahd Press Conference : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलीय. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून कोकाटे यांच्या राजीनामाच्या जोरदार मागणी करण्यात आलीय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. "आतापर्यंत भारतभर ज्या घटना घडल्या आहेत, त्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं. ते मंत्री आहेत, नुसते आमदार असतं तर ठीक आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला माणूस कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय, हे जजमेंटमध्ये लिहिलं आहे. थोडसं अभ्यास करून यावर निर्णय घेणे आवश्यक आहे", असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

"कोर्टाने जे काही म्हणणं मांडलय, ते अतिशय गंभीर आहे. त्याचा विचार करणे फार गरजेचं आहे. कोर्ट म्हणत आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वत: राजकारणी आणि वकील असून सुद्धा त्यांना परिणामांची कल्पना होती, तरीही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे. गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारी वैयक्तीक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे. कोर्टाने जे म्हटलंय ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला डाग लावणारं आहे. मंत्री असल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, असा संदेश देणे आवश्यक आहे. हे कोर्टाने म्हटलं आहे".

हे ही वाचा >> IND vs PAK : अक्षर पटेलचा परफेक्ट थ्रो अन् इमामचा खेळ खल्लास! रनआऊटचा Video पाहून थक्कच व्हाल

कोर्ट जेव्हा म्हणतं की संदेश देणं आवश्यक आहे. तेव्हा कोर्टाचंही काम आहे, फसवणुकीच्या गुन्ह्यात प्रचलित कायद्यानुसार त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. आतापर्यंत भारतभर ज्या घटना घडल्या आहेत, त्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं. ते मंत्री आहेत, नुसते आमदार असतं तर ठीक आहे. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला माणूस कायद्याने गुन्हेगार सिद्ध झालाय, हे जजमेंटमध्ये लिहिलं आहे. थोडसं अभ्यास करून यावर निर्णय घेणे आवश्यक आहे. सल्लागार समितीच्या बैठकीत हा राजीनामा मांडण्याचं कारणच नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा >> "ती शिवसेना नाही, गद्दारांची सेना, निष्ठावंत शिवसैनिक...", उद्धव ठाकरेंचा DCM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

कारण आपण फक्त विधानसभेच्या अधिवेशनाबाबत बोलत असतो. राहूल नार्वेकरांना मी एक पत्र देतोय, त्यात निकालपत्र जोडून देतोय. महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला  थोडासा उशिर होतोय. त्याचं कारण समजत नाही मला. ते स्वत: वकील आहेत आणि त्यांचा वकिलीचा अभ्यासही दांडगा आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी. आम्ही त्यांना काही सांगायला नको खरंतर.. तुम्ही राहूल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं. तुम्ही अनेक कारवाया केल्या. इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही. माझ्याकडे निकालपत्र आहे. मी ते त्यांन नेऊन देणार, असं मोठं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp