Sharad Pawar Meets Ajit Pawar : पवार काका-पुतण्याची भेट वेगळ्याचं कारणासाठी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad Pawar meets Ajit Pawar : many questions raised after sharad pawar ajit pawra meeting.
Sharad Pawar meets Ajit Pawar : many questions raised after sharad pawar ajit pawra meeting.
social share
google news

Ajit Pawar Meet Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले, पण त्यावर अजूनही अविश्वास व्यक्त होतोय. त्याचं कारण म्हणजे अजित पवार-शरद पवारांच्या भेटी. 12 ऑगस्ट रोजी पवार काका-पुतण्या उद्योजक अतुल चोरडियांच्या घरी भेटले. ही भेट अजित पवारांनी शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी घेतल्याचे सांगण्यात आले. पण, याबद्दल आता वेगळी माहिती समोर आलीये. (Why Did Sharad Pawar meet ajit pawar in pune)

ADVERTISEMENT

कोरगाव पार्कमधील उद्योजक अतुल चोरडियांच्या घरी एक बैठक झाली. या भेटीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवारांनी बोलणं टाळलं. पण, पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार-शरद पवार भेट

पुण्यात झालेल्या पवार काका-पुतण्या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. पहिला अर्थ म्हणजे अजित पवारांनी बंड केले, पण त्यांना अजूनही पुरेशा आमदारांचा पाठिंबा मिळाला नसल्याचे दिसते. कारण अजित पवार गटाकडून अजूनही त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, याबद्दल खात्रीशीर माहिती देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> ‘महाराष्ट्र म्हणजे गंमत जंमत नाही’; ठाकरेंचा शरद पवारांना इशारा, स्फोटक भाष्य

दुसरं कारणं म्हणजे अजित पवारांनी बंड केले. सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावाही केलाय. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावाही केलाय. पण, अजित पवारांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षित पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच शरद पवारांना सोबत घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आपण शरद पवारांना सोडलेलं नाही, हे सातत्याने दाखवत आहे. त्यांच्या गटाकडून मुद्दामहून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे.

अजित पवारांना परत आणण्याचे प्रयत्न

आता मुद्दा हा की शरद पवार अजित पवारांना का भेटले? तर याबद्दल महत्त्वाची माहिती अशी की भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांना पुन्हा परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शरद पवारांच्या जवळच्या व्यक्तींकडून अजित पवारांना परत आणण्यासाठी मध्यस्थी सुरू आहे. या मध्यस्थांनीच शरद पवार-अजित पवार भेट घडवून आणली.

ADVERTISEMENT

याला खुद्द शरद पवारांनीच दुजोरा दिलाय. 13 ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, “अजित पवारांना परत आणण्यासाठी त्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते भाजपसोबत गेले आहेत. त्यांच्या भूमिकेत बदल होऊ शकतो का? त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यामुळे सुसंवादाचे प्रयत्न होताहेत. पण, आम्ही भाजपसोबत जाणार नाही”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

वाचा >> NCP तील बंडानंतर अजित पवारांसोबत चार भेटी, शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी शरद पवारांनी बारामतीमध्ये बोलताना सांगितले की, “संभ्रम वगैरे काही नाही. महाविकास आघाडी विचाराने एकत्र आली. ज्यांची भूमिका आज देशपातळीवर आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे. त्या घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग असण्याचं कारण नाही. ही भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभ्रम राहिलेला नाही. काल मी सोलापूरला होतो आणि त्या ठिकाणी मी ही गोष्ट स्पष्ट केली. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT