‘उद्धव ठाकरे, न्यूरो सर्जनला भेटून घ्या म्हणजे…’, भाजपने का दिला सल्ला?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असं बावनकुळेंनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
Bjp on Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. दुसऱ्या भागातही ठाकरेंनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेल्या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळे यांनी ठाकरेंना डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही दिला आहे.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे नरेंद्र मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील.”
वाचा >> Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य
‘2024 मध्ये जनता तुम्हाला आवडीचं काम देणार’
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या एका गटासोबतही घरोबा केला आहे. त्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. याच टीकेला उत्तर देताना बावनकुळेंनी म्हटलं आहे की, “महायुतीच्या जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का ? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी 5 दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण 2024 साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2023
वाचा >> Raj Thackeray : ‘हे नितीन गडकरींचं अपयश, महाराष्ट्राचं दुर्दैव’, राज ठाकरे का भडकले?
“30 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल”, असा इशारा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT