Angelo Mathews बॅटिंग न करताच झाला बाद, इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘टाइम आऊट’

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Angelo Mathews timed out Angelo Mathews controversial wicket video
Angelo Mathews timed out Angelo Mathews controversial wicket video
social share
google news

Angelo Mathews Timed Out : फलंदाजासाठी मैदानात उतरला, पण बॅटिंग करण्याआधीच अंपायरने बाद घोषित केले. तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे खरंय. आणि हे घडलं तेही विश्वचषक स्पर्धेत. सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका आणि बांगलादेश सामन्यात हे घडलं. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात फलंदाजी करण्याआधीच बाद झालेल्या या खेळाडूचं नाव आहे अँजेलो मॅथ्यूज.

ADVERTISEMENT

भारतात विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. 6 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. याच सामन्यात श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज विचित्र पद्धतीने बाद झाला. अशा पद्धतीने बाद होणारा तो क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे एखादा खेळाडू ‘टाइमआऊट’ होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मॅथ्यूजला एक चूक पडली महागात

ही संपूर्ण घटना श्रीलंकेच्या डावाच्या 25 व्या षटकात घडली. हे षटक बांगलादेश संघाचा कर्णधार आणि फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनने केले. शाकिबने दुसऱ्याच चेंडूवर सदीरा समरविक्रमाला झेलबाद केले. यानंतर अँजेलो मॅथ्यूज पुढचा फलंदाज म्हणून खेळायला आला. पण यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली.

हे वाचलं का?

Virat Kohli Sachin Tendulkar : कोहलीला सचिन म्हणाला, “मला 365 दिवस लागले, पण तू…”

खेळायला येताना मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घेऊन आला. खेळपट्टीवर आल्यानंतर त्याने पॅव्हेलियनमधील सहकारी खेळाडूला दुसरे हेल्मेट आणण्यास सांगितले. याच दरम्यान शाकिबने अंपायरकडे ‘टाइम आऊट’चे अपील केले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मैदानावरील पंचांना सुरुवातीला हा विनोद वाटला, पण शाकिबने स्पष्ट केले की तो खरोखरच अपील करत आहे.

Richard Kettleborough : कोहलीच्या शतकासाठी दिला नाही वाइड बॉल, नियम की फिक्सिंग?

त्यानंतर मैदानावरील दोन्ही पंचांनी एकमेकांशी बोलून मॅथ्यूजला ‘टाइम आऊट’ घोषित केले. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघाने एकाच चेंडूवर दोन विकेट गमावल्या. पंचांच्या निर्णयानंतर मॅथ्यूज निराश झाला आणि त्याला एकही चेंडू न खेळताच मैदान सोडावे लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू अशाप्रकारे ‘टाइमआऊट’ होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘टाइम आउट’ नियम काय आहे?

40.1.1 नुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही, तर त्याला बाद घोषित केले जाते. याला ‘टाइम आउट’ म्हणतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

40.1.2 नुसार, या निर्धारित वेळेत (3 मिनिटं) नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला नाही, तर पंच नियम 16.3 (अंपायर्सद्वारे मॅचचा पुरस्कार) ची प्रक्रिया पाळतील. परिणामी, वरील नियमाप्रमाणेच फलंदाजाला ‘टाइम आऊट’ घोषित केले जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT