Puja Khedkar : पूजा खेडकरची IAS नोकरी गेली! यूपीएससीचा सर्वात मोठा दणका
Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या पूजा खेडकरांवर यूपीएससीने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द
यूपीएससी परीक्षा देण्यावर कायमची बंद
पूजा खेडकरबद्दल यूपीएससीने काय म्हटलं आहे?
Puja Khedkar UPSC News : बनावट अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या मुद्द्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पूजा खेडकरची नोकरी अखेर गेली. केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षा देण्यावर आणि निवड कायमची बंदी घालण्यात आली आहे. (UPSC cancels provisional candidature of Puja Dilip Khedkar and permanently debars her from all the future Exams)
ADVERTISEMENT
केंद्रीय लोक सेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रक जारी केले असून, त्यात पूजा खेडकरने केलेल्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली आहे. पूजा खेडकरने नियमांचं उल्लघन करत परवानगी पेक्षा अधिक वेळा परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकरने यासंदर्भात बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले असून, आणखी वेळ मागितला आहे.
हेही वाचा >> पूजा खेडकरांमुळे वादात सापडलेल्या 'यूपीएससी'ची सूत्रे IAS महिलेच्या हाती
पूजा खेडकरची प्रशिक्षणार्थी आयएएस नियुक्ती रद्द
यूपीएससीने म्हटले आहे की, पूजा खेडकरचे मागील सर्व रेकॉर्ड तपासले. प्रशासकीय सेवा परीक्षा 2022 नियमानुसार ती दोषी असल्याचे आढळून आले आहे. तिची प्रशिक्षणार्थी उमेदवारी रद्द करण्यात येत आहे. त्याचबरोबर यूपीएससीच्या सर्व परीक्षा देण्यावर, निवडीवर कायमची बंदी घालण्यात येत आहे.
हे वाचलं का?
यूपीएससीने पूजा खेडकरमुळे मागील 15 वर्षांचे रेकॉर्ड खंगाळले
पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळे यूपीएससीने गेल्या 15 वर्षातील म्हणजे 2009 ते 2023 पर्यंतचे सर्व रेकॉर्ड तपासले. यात वैध संधीपेक्षा जास्त वेळा परीक्षा देणारी पूजा खेडकर ही एकमेव असल्याचे समोर आले.
हेही वाचा >> 'एक तर तू राहशील नाहीतर मी तरी...', ठाकरेंचं फडणवीसांना खुलं आव्हान
पूजा खेडकरने वैध संधींपेक्षा जास्त परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले आहे. पण तिने नेमकी किती वेळा परीक्षा दिली याबद्दल माहिती नाही. कारण पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली. त्यामुळे याबद्दलचा निश्चित आकडा मिळलेला नाही, असेही यूपीएससीने म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पूजा खेडकरने दिले नाही उत्तर
यूपीएससी आयोगाने नोटीस बजावण्यात आली होती. ३० जुलै दुपारी ३.३० वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. पण, वेळ वाढवून देऊनही पूजा खेडकर उत्तर देऊ शकली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT